महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न उफाळला, उद्धव ठाकरेंचा पुतळा जाळून निषेध व्यक्त

साम टीव्ही न्यूज
रविवार, 29 डिसेंबर 2019

गेल्या अनेक दशकांपासून रखडलेला बेळगाव प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.  महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांनी कन्नड ध्वजाचे दहन केल्याचे पडसाद बेळगावात उमटले. कन्नड संघटनांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत, ठाकरेंच्या निषेधार्थ घोषणादेखील दिल्या.

दरम्यान चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा आज बेळगावात सत्कार होणार आहे. मात्र या कार्यक्रमाविरोधात कन्नड नवनिर्माण सेनेने एल्गार पुकारलाय. सीमा प्रश्नावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत. तणाव आणि नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचे निर्देशही पोलिसांनी परिवहन महामंडळाला दिले आहेत. दरम्यान, मध्यवर्ती बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

उद्धव ठाकरेंचा पुतळा जाळला...

कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील याची प्रतिमात्मक अंतयात्रा काढल्यानंतर आता त्याचे पडसाद कर्नाटकात उमटतायेत. बेळगाव कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पोस्टर जाळलेत.. तसच उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आलाय. त्यामुळे हा वाद पेटण्याची चिन्ह आहे. कर्नाटक नवनिर्माण सेनेचा नेता भीमाशंकर पाटील यानं काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती. 

संबंधित बातम्या

Saam TV Live