कोण राखणार कर्नाटकचं तख्त? थोड्याच वेळात होणार स्पष्ट   

कोण राखणार कर्नाटकचं तख्त? थोड्याच वेळात होणार स्पष्ट   

बंगळूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होत आहे. १२ मे रोजी ७० टक्के मतदान झाल्यानंतर काँग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बहुमतासाठी 112 जागा मिळणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सत्तेवर पुन्हा दावा केला असून भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येडियुरप्पा यांनीही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. तर धर्मनिरपेक्ष जनता दल हा पक्ष राज्यात सत्तास्थापनेत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावेल, असे संकेत मतपूर्व चाचण्यांत देण्यात आले आहेत. 

साधारणत: मजमोजणी प्रारंभ होताच एक तासानंतर निकालांचा कल स्पष्ट होण्यास प्रारंभ होईल, तर सायंकाळी उशिरा सर्व निकाल लागण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस पक्षाने जर आपले बहुमत खेचून आणले अथवा सत्ता स्थापन केल्यास १९८५ पासून पहिल्यांदाच एकाच पक्षास कर्नाटकात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेस संधी मिळणार आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेडगे यांनी दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीनंतर मागसवर्गीय नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना पुन्हा संधी दिली जाण्याच्या तर्क-वितर्कांनाही जोर सध्या अाला अाहे. 

दुसरीकडे कॉंग्रेसला जागा कमी पडल्यास जनता दलाबरोबर युतीची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या हे पूर्वश्रमीचे जनता दलाचे असून त्यांनी कॉंग्रेस प्रवेशानंतर जोरदार मुसंडी मारत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले होते. सिद्धरमय्या यांच्या विरोधात भाजप आणि जनता दलाने चांगलीच आघाडी उघडली होती. अर्थात धर्मनिरपेक्ष जनता दल हा देवेगौडा यांचे पुत्र हच. डी. कुमारस्वामी यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागणार आहे. कुमारस्वामी ‘किंगमेकर’ नाही, तर ‘किंग’ होण्याची शक्यता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. 

‘‘विधानसभेच्या सर्व जागांचे निकाल लागल्यानंतरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू अशी प्रतिक्रिया जनता दल (से.)चे नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे. निवडणुका झाल्या असून सरकार स्थापनेबाबत कोणतीही घाईने भूमिका घेण्याची गरज नाही.’’ 
- एच. डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान, धर्मनिरपेक्ष जनता दल नेते. 

‘‘निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि मी मुख्यमंत्री होईल, असा मला विश्‍वास आहे. दलित मुख्यमंत्री होण्यासही माझी कोणतीही आडकाठी नाही. मात्र, हायकमांड जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, याकरिता ते विजयी उमेदवारांची मते जाणून घेतील. ’’ 
- मुख्यमंत्री सिद्धरमय्या
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com