कर्नाटकात भाजपला सत्तेपासून वंचित राहावं लागणार? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

बंगळूर : भाजपचा चौफेर उधळलेला विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसने आज (मंगळवार) धर्मनिरपेक्ष जनता दलास बिनशर्त पाठिंबा दिला. यामुळे कर्नाटकात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. दुपारी चारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपकडे 104 जागांवर आघाडी होती. काँग्रेस 78, तर धर्मनिरपेक्ष जनता दल 37 जागांवर आघाडीवर होते. येथील 224 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 112 जागांची आवश्‍यकता असते. 

सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे भाजप सहज सत्ता स्थापन करेल, अशी दुपारपर्यंतची स्थिती होती. पण काँग्रेसने वेगाने राजकीय डावपेच लढविले आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला बिनशर्त पाठिंबा दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. 'आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा देऊ केला आहे. त्यांनीही हा प्रस्ताव स्वीकारला आहे', असे आझाद यांनी सांगितले. या प्रस्तावानुसार, मुख्यमंत्री धर्मनिरपेक्ष जनता दलाचा असेल. 

या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने आज सायंकाळी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली आहे. या भेटीदरम्यान हे दोन्ही पक्ष सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्‍यता आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live