कर्नाटकात आज भाजपची परिक्षा, येडियुरप्पा सरकार पडणार की तरणार?

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 9 डिसेंबर 2019

कर्नाटकात येडियुरप्पा सरकार राहणार की कोसळणार हे आज ठरणार आहे. विधानसभेच्या 15 जागांवरील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीस सुरुवात झाली असून,  निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवून सत्तेबाहेर बसावं लागलेल्या भाजपचा. कर्नाटकात काय निकाल लागतो याचीच प्रत्येकाला उत्सुकता आहे.  कर्नाटकात 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीकरिता 69.49 टक्के मतदान झालंय. कर्नाटकात बी. एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला. सत्ता कायम ठेवण्यासाठी आणखी 6 आमदारांची गरज आहे. सध्या भाजपकडे 105 आमदार आहेत.

कर्नाटकात येडियुरप्पा सरकार राहणार की कोसळणार हे आज ठरणार आहे. विधानसभेच्या 15 जागांवरील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीस सुरुवात झाली असून,  निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवून सत्तेबाहेर बसावं लागलेल्या भाजपचा. कर्नाटकात काय निकाल लागतो याचीच प्रत्येकाला उत्सुकता आहे.  कर्नाटकात 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीकरिता 69.49 टक्के मतदान झालंय. कर्नाटकात बी. एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला. सत्ता कायम ठेवण्यासाठी आणखी 6 आमदारांची गरज आहे. सध्या भाजपकडे 105 आमदार आहेत. पोटनिवडणुकीत 15  पैकी 12 जागा काँग्रेस आणि 3 जागा जेडीएसने लढवल्या आहेत. 

जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना काँग्रेस आणि जेडीएसमधील 17 आमदारांनी बंडखोरी शस्त्र उपसले होते. बंडखोरीमुळे कुमारस्वामी यांचे सरकार जुलै महिन्यात कोसळले. त्यानंतर कर्नाटकात मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन केले. 224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेच संख्याबळ 17 आमदारांच्या बडतर्फीनंतर 208 वर आले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. सध्या भाजपाचे 105 आमदार आहेत. 

आता भाजपची परिक्षा आहे. महाराष्ट्रातील राजकारणाने भाजपची झोप उडवली असतानाच आता कर्नाटकात नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष आहे. कर्नाटकात विधानसभेच्या 15 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागेल. त्यावरच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचं भवितव्य ठरणार आहे. सुरवातीच्या कलानुसार 15 पैकी 8 जागांवर भाजप आघाडीवर आहे. दरम्य़ान पोटनिवडणुकीसाठी 69.49 टक्के मतदान झालंय. 

Web Title: Karnataka Bypoll Results BJP Widens Lead Over some seats


संबंधित बातम्या

Saam TV Live