कर्नाटकमध्ये सापडलीत 9 हजार 746 बनावट मतदार ओळखपत्रं

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 मे 2018

कर्नाटकमध्ये एका फ्लॅटमधून 9 हजार 746 बनावट मतदार ओळखपत्रे सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. हा प्रकार गंभीर असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय.. या बनावट मतदार ओळखपत्रांवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ही ओळखपत्रे बनवण्यामागे  आर. आर. नगर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मुनीरत्ना नायडू यांचा हात असल्याचा आरोप भाजपा नेते सदानंद गौडा यांनी केला आहे. तर या प्रकरणावरून भाजपा नाटक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live