कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 एप्रिल 2018

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 72 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपानं पहिल्या यादीत कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या येडियुरप्पांच्या नावाचा समावेश केला असून, त्यांना शिकारीपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची रविवारी बैठक झाली होती. या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच 2019च्या लोकसभा निवडणुकीवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत दलितांमध्ये वाढलेला असंतोष, एनडीएच्या मित्र पक्षांनी सोडलेली साथ या विषयांवरही चर्चा करण्यात आली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 72 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपानं पहिल्या यादीत कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या येडियुरप्पांच्या नावाचा समावेश केला असून, त्यांना शिकारीपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची रविवारी बैठक झाली होती. या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच 2019च्या लोकसभा निवडणुकीवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत दलितांमध्ये वाढलेला असंतोष, एनडीएच्या मित्र पक्षांनी सोडलेली साथ या विषयांवरही चर्चा करण्यात आली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांवरही बैठकीत चर्चा झाली. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live