कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 मे 2018

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार अशी भविष्यवाणी केलीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी. कर्नाटकात भाजपचा जोरदार प्रचार सुरू असला तरी काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी राज्यात चांगलं काम केलंय. त्यांनी गोरगरिबांपर्यंत शासनाच्या सर्व योजना राबवल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकी जनतेचा काँग्रेसकडे ओढा आहे. त्यामुळे भाजपनं कितीही प्रयत्न केले, तरी काँग्रेसचंच सरकार सत्तेवर येईल, असं शरद पवार यांनी म्हंटलंय. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live