कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळले; भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जुलै 2019

बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज (मंगळवार) घेण्यात आला. हा विश्वासदर्शक ठराव मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याविरोधात आल्याने आता त्यांचे सरकार कोसळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आमदार किती आहेत, याबाबतची मोजणी करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय समोर आला आहे. कर्नाटकातील आमदारांनी मंगळवारी कामकाज घेण्याची मागणी करत केलेला गदारोळ सत्ताधाऱ्यांच्या पथ्थ्यावर पडला. तर भाजपने आजच कितीही वेळ लागला तरी कामकाज चालवण्याची केलेली विनंती अध्यक्षांनी नजरेआड केली होती. त्याचवेळी अध्यक्षांनी सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत उद्या चारपर्यंत चर्चा तर सहापर्यंत मतदान घेण्याचा निर्णय घेतला. तसेच उद्या सहा वाजल्यानंतर एकही मिनिट थांबणार नसल्याचा कडक इशारा दिला. 

त्यानंतर कर्नाटकात प्रत्यक्ष मतमोजणी घेण्यात आली होती. या मतमोजणीनंतर हा निकाल हाती आला आहे.  

WebTitle : marathi news Karnataka Government fails trust vote in Assembly

संबंधित बातम्या

Saam TV Live