कर्नाटकात भाजप तोंडघशी.. पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

कर्नाटक :  बहुमत मिळूनही सत्तेची चव चाखायला मिळाली नसल्याने आधीच निराश झालेल्या भाजपला कर्नाटक पोटनिवडणुकीत नामुष्कीजनक हार पत्करावी लागलीय. कर्नाटमधील आज तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघांचे निकाल स्पष्ट झालेत. काँग्रेस-जेडीएस आघाडी 4 तर भाजपा एकाच जागेवर जिंकलीय.  बल्लारी लोकसभा मतदारसंघ आणि जामखांडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मांडया लोकसभा आणि रामानागारा विधानसभा मतदारसंघातून जेडीएस उमेदवाराने विजय मिळवला आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत दोन खासदारांना आमदारकीसाठी राजीनामा द्यायला लावणं भाजपला महागात पडलंय. 

विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी शिमोगा मतदारसंघातून लोकसभेवर गेलेले बी एस येडीयुराप्पा यांनी राजीनामा दिला होता. तर बेळ्ळारीहून लोकसभेवर गेलेले श्रीरामलू यांनीही आमदारकीसाठी राजीनामा दिला होता. मात्र, भाजपाच्या हा जुगार अंगाशी आला असून बेळ्ळारीची जागा मोठ्या फरकानं गमवावी लागलीय. तर येडीयुराप्पा यांचे पुत्र आणि माजी खासदार राघवेंद्र हे शिमोगा मतदारसंघातून निवडून आलेत. भाजपाची या निवडणुकीत पिछेहाट झालीय. साहजिकच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live