पी. चिदम्बरम यांचा मुलगा कार्ती चिदम्बरमला अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचा मुलगा कार्ती चिदम्बरमला सीबीआयने अटक केली आहे. आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक झाली असून लंडनहून परतताच सीबीआयने त्याला चेन्नई एअरपोर्टवर बेड्या ठोकल्या. चौकशीत कार्ती सहकार्य करत नसल्याचं सांगत, अटक केल्याचं सीबीआयने स्पष्ट केलं. याआधी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दोनवेळा कार्ती चिदम्बरमच्या मालमत्तेवर ईडीने छापेमारीसुद्धा केली होती. तत्पूर्वी 26 फेब्रुवारीला कार्तीचा सीए. एस. भास्कररमन याला दिल्ली कोर्टाने 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

संबंधित बातम्या

Saam TV Live