कार्ती यांना आता 'ईडी'कडून होणार अटक ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

नवी दिल्ली : 'आयएनक्स' मीडिया गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कोठडी आज संपत आहे. तत्पूर्वी कार्ती चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सक्तवसुली संचलनायामार्फत (ईडी) होणारी संभाव्य चौकशी टाळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. मात्र, न्यायालयाने त्यांना अंतिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे आता कार्ती चिदंबरम यांची सक्तवसुली संचलनालयाकडून अटक केली जाण्याची शक्यता आहे. 

कार्ती चिदंबरम यांना मागील आठवड्यात सीबीआयकडून अटक करण्यात आली. मात्र, आता कार्ती यांची सीबीआय कोठडी आज संपत असल्याने आजपासून त्यांची 'ईडी'कडून अटक केली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्ती चिदंबरम यांचे वकिल कपिल सिब्बल यांनी कार्ती यांची सक्तवसुली संचलनालयामार्फत होणारी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना यावर कोणताही दिलासा दिला नाही. 

सर्वोच्च न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर न्यायालयाने 'ईडी'ला याबाबत नोटीस बजावली आहे. सीबीआयने यापूर्वी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live