... काश्मीर हा भारताचा भाग नसेल- वायको

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

चेन्नई : भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा काश्मीर हा भारताचा भाग नसेल, असे वक्तव्य एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी केले आहे.

केंद्रातील भाजप सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे संस्थापक सी. एन. अण्णादुराई यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वायको यांनी काश्मीरच्या प्रकरणावर वक्तव्य केले आहे. 

वायको म्हणाले, की भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असताना काश्मीर भारताचा भाग राहणार नाही. काश्मीरच्या प्रश्नावर मी यापूर्वीही भूमिका मांडली आहे. भाजपने काश्मीरला गाळात घातले. काश्मीरच्या प्रश्नाला 30 टक्के काँग्रेस आणि 70 टक्के भाजप जबाबदार आहे.

Web Title: Kashmir will not be part of India on 100th independence day says Vaiko
 
संबंधित बातम्या

Saam TV Live