काठमांडूत बांगलादेशचे प्रवासी विमान कोसळले

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 मार्च 2018

काठमांडू - बांगलादेशहून नेपाळकडे येणारे विमान आज (सोमवार) राजधानी काठमांडूच्या विमानतळाजवळ कोसळले. विमानात 67 प्रवाशांसह 17 कर्मचारी होते. बांगलादेशची राजधानी ढाका येथून काठमांडूकडे येणारे विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना अनियंत्रित झाले आणि कोसळले. विमानाला आग लागली असून ती विझवण्याचे काम सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान, काठमांडू विमानतळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार,  विमानातील 17 जणांना वाचवण्यात यश आले असून, नेपाळ लष्कराने मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live