#KeralaFloods: युएईतील भारतीयांची केरळ पूरग्रस्तांना मदत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

तिरूअनंतपुरम : केरळ राज्यात पावसामुळे हाहाकार माजला असून, देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आव्हान केले जात आहे. पेटीएम व अॅमेझॉनद्वारे सर्व देशभरातून केरळमधील नागरिकांना मदत मिळत असतानाच, आता युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातींमधील देशात राहणाऱ्या आणि मूळ भारतीय असणाऱ्या व्यापाऱ्यांनीही केरळ पूरग्रस्तांना भरघोस मदत केली आहे.

युएईतील मूळ भारतीय असलेल्या व्यापारी व उद्योगपतींनी 12.5 कोटी रूपये मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. युएईमध्ये 26 लाख भारतीय असून, तेथे भारतीयांचे प्रमाण 30 टक्के आहे. मूळचे केरळचे असणारे, पण सध्या युएईमध्ये वास्तव्यास असणारे युसूफ अली यांनी 5 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. फातिमा हेल्थकेअरस समुहाचे अध्यक्ष के. पी. हुसेन यांनीही 5 कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच हुसेन यांनी सांगितले की, त्यांच्यातर्फे वैद्यकीय मदत पथके पाठवण्यासाठी केरळच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली आहे. तसेच युएईचे पंतप्रधान आणि दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांनी केरळला मदत करण्यासाठी आपत्कालीन समिती तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

WebTitle : marathi news kerala floods Indians from UAE help for flood victims 

संबंधित बातम्या

Saam TV Live