#KeralaFloods : गेल्या 100 वर्षांतला केरळमधील सर्वात भीषण पूर; 324 जणांनी गमावले प्राण

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पंतप्रधान मोदीही केरळमध्ये दाखल झाले आहेत, मोदी आज संपूर्ण केरळची हवाई पाहणी करणार आहेत.

महापुरामुळे केरळमध्ये हाहाकार माजला असून, 324 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असून. आतापर्यंत 82 हजार लोकांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले आहे. तर, दोन लाख नागरिक बेघर झाले आहेत. 

गेल्या 100 वर्षांतला केरळमधील हा सर्वात भीषण पूर असल्याचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी म्हटले आहे. हवामान खात्यानं राज्यातील 14 पैकी 13 जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 

केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहता एनडीआरएफच्या पाच टीम तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच एनडीआरएफची आणखी जवान केरळमध्ये दाखल होणार आहेत.

पंतप्रधान मोदीही केरळमध्ये दाखल झाले आहेत, मोदी आज संपूर्ण केरळची हवाई पाहणी करणार आहेत. 

दरम्यान, सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री मदत निधीसह अन्न आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात येत आहे. आंध्र प्रदेश आणि पंजाबने प्रत्येकी 10 कोटी रुपयांची मदत केरळला देऊ केली असून दिल्ली सरकारकडून 10 कोटी, तेलंगणाकडून 25 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.  केंद्राने आतापर्यंत 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

WebTitle : marathi news kerala floods overall condition in kerala 


संबंधित बातम्या

Saam TV Live