केरळमध्ये मुसळधार पावसाचा धुमाकूळ ; आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

केरळमध्ये मुसळधार पावासने धुमाकूळ घातलाय. इडुक्की, पलक्कड या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर जवळपास 50 हजारहून अधिक लोक बेघर झालेत. पाण्याच्या सतत वाढत जाणाऱ्या पातळीमुळे इडुक्कीमधील चीरुथोनी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. वायनाड, मालाप्पूरम आणि इडुक्कीमध्ये काही ठिकाणी दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत.

केरळमध्ये पावसामुळे तिसरा रेड अलर्ट जारी झाला असून लष्कर, नौदल आणि एअर फोर्सला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

WebLink :  marathi news kerala monsson heavy rain updates 29 died 

संबंधित बातम्या

Saam TV Live