सबरीमला मंदिर महिलांसाठी खुलं

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

सबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. त्यानंतर आजपासून हे मंदिर पहिल्यांदाच महिलांसाठी खुलं केलं जाणार आहे.

मात्र, मंगळवारी अय्यप्पाच्या भाविक महिलांनी सबरीमला मंदिराकडे निघालेल्या १० ते ५० वर्षे वयोगटातील मुली आणि महिलांना रोखल्याने तणावाची स्थिती निर्माण झालीय. या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा भाविकांनी दिलाय.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी महिलांना मंदिर प्रवेशापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिलाय. सबरीमलाच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असंही ते म्हणालेत.  

WebTitle : marathi news kerala sabrimala temple open for all women 

संबंधित बातम्या

Saam TV Live