या महिलेनं केला अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा!

या महिलेनं केला अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा!

तिरूअनंतरपुरम (केरळ) : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल या आपल्या आई आहे, असा दावा केरळच्या एका महिलेने केला आहे. शिवाय, या महिलेने कौटुंबिक न्यायालयात अनुराधा पौडवाल यांच्याविरोधात खटला दाखल केला असून, 50 कोटी रुपयांची भरपाई द्या अशीही मागणी केली आहे.

करमाला मोडेक्स असे या महिलेचे नाव आहे. करमाला तिरुअनंतपुरमची रहिवासी आहे. करमाला यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. करमाला यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांचा जन्म 1974 मध्ये झाला. एका मुलाखतीदरम्यान त्या म्हणाल्या, 'मी अवघी चार वर्षांची असताना अनुराधा पौडवाल यांनी मला पोन्नाचन आणि अॅग्नेस या दाम्पत्याला दत्तक दिले. अनुराधा पौडवाल यांनी जर माझा दावा फेटाळला तर मी डीएनए टेस्टसाठीही तयार आहे, ज्यानंतर सगळं काही सिद्ध होईल. मला जन्म देणारी आई अनुराधा पौडवाल आहेत हे मला पाच वर्षांपूर्वी समजले. माझ्या वडिलांनी त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी मला हे सत्य सांगितले. मी चार दिवसांची होते त्यावेळी अनुराधा पौडवाल यांनी माझे पालक पोन्नाचन आणि अॅग्नेस यांच्याकडे सोपवले. माझे वडील लष्करात होते. अनुराधा पौडवाल यांचे ते चांगले मित्र होते. कालांतराने त्यांची बदली केरळमध्ये झाली. अनुराधा त्यावेळी आपल्या करिअरमध्ये व्यस्त होत्या आणि बाळाची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी नव्हती, त्यामुळे त्यांनी मला अॅग्नेस यांच्याकडे सोपवले. वडिलांकडून त्यांच्या मृत्यूपूर्वी मी सत्य ऐकले. त्यानंतर अनुराधा पौडवाल यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.'

करलमाला यांनी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला असून, अनुराधा पौडवाल यांच्याकडे त्यांनी 50 कोटींची नुकसानभरपाई मागतली आहे. तिरूअनंतरपुरम न्यायालयाने पौडवाल यांना नोटीस बजावली असून, 27 जानेवारीला न्यायालयात हजर राहायला सांगितले आहे.

करमाला यांचे वकील अनिल प्रसाद म्हणाले, 'करमाला यांना लहानपणापासून आईचे प्रेम मिळाले नाही. त्यांना दु:ख सोसावे लागले. अनुराधा पौडवाल यांनी त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. शिवाय, मुलगी म्हणून स्वीकार करावा. त्यांनी तसे केले नाही तर आम्ही डीएनए चाचणीची मागणी करणार आहोत.'

Web Title: Kerala woman claims she is the daughter of bollywood singer anuradha paudwal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com