जगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवली 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 जून 2018

पुरीतल्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवल्यानं मोठी खळबळ उडलीय. खजिना असलेल्या आंतरिक कक्षाची चावीही गायब झाली आहे. यानंतर पुरीचे शंकराचार्य आणि भाजपनं पटनायक सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

ओडिशा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 4 एप्रिलला 34 वर्षानंतर एक चौकशी समिती मंदिरात आली होती. तेव्हापासून ही चावी गायब आहे. खजिन्याची चावी श्रीजगन्नाथ मंदिर प्रबंधकाजवळ नाही, तसंच कोषागारालाही या चावीसंदर्भात काहीही माहिती नाही,  जगन्नाथ मंदिराच्या प्रबंधन समितीचे सदस्य रामचंद्र दास महापात्रा यांनी ही माहिती दिलीय.

आता या चावीवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. भाजपा सरकारनंही या प्रकारानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक सरकारकडून स्पष्टीकरण मागवलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live