खिलाडी अक्षय कुमारचं ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पाहिलं का ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 जुलै 2019

सध्या ‘बॉटल कॅप चॅलेंज’ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेण्ड होतोय. या चॅलेंजने आता सेलिब्रिटीजनाही भुरळ घातलीय. हॉलिवूड अभिनेता जेसन स्टॅथमपासून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने हे आव्हान स्वीकारलंय.

‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करतानाचा व्हिडीओ अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलाय. ‘हे करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही. जे व्हिडीओ मला आवडतील ते मी रिट्विट आणि रिपोस्ट करेन असं या खिलाडीने म्हटलंय. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी जेसन स्टॅथमचा आदर्श समोर ठेवल्याचं अक्षयने म्हटलं. 

अभिनेता टायगर श्रॉफ  आणि विद्युत जामवाल यांनाही अक्षयने चॅलेंज पूर्ण करण्यासाठी टॅग केलंय. बॉटल कॅप चॅलेंजमध्ये आपल्या उंचीला समांतर अशी एक बॉटल समोर ठेवली जाते, त्यानंतर गोल फिरून पायाने त्या बॉटलचं झाकण उडवण्याचा प्रयत्न केला जातो. असं करताना ती बॉटल खाली पडू द्यायची नसते.

WebTitle : marathi news khiladi akshay kumar viral bottle cup challenge

संबंधित बातम्या

Saam TV Live