'किडनी व्हॅली'; या गावात सगळ्यांनी विकलीये आपली किडनी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

आपल्या जगात एक असं गाव आहे ज्या गावातील सगळ्यांनी किडनी विकलीये. नेपाळमधील होकसे या गावातील ही धक्कादायक बाब आता समोर आलीये. होकसे या गावाला ‘किडनी व्हॅली’ असंदेखील म्हटलं जातं.  सर्वाधिक लोकांनी घर खरेदी करण्याच्या नावाखाली आपली किडनी विकली आहे. यामधील अनेकांची घरे नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर उद्ध्वस्त झाली होती.  नेपाळमधील शक्‍तिशाली भूकंपानंतर या गावाकडे काठमांडूच्या मानवी अवयव तस्कारांचे लक्ष गेले. तुमच्या शरीरात पुन्हा नवी किडनी तयार होईल, अशी खोटी माहिती देत त्यांनी अनेक गावकर्‍यांना किडनी विकण्यासाठी तयार केले.

आपल्या जगात एक असं गाव आहे ज्या गावातील सगळ्यांनी किडनी विकलीये. नेपाळमधील होकसे या गावातील ही धक्कादायक बाब आता समोर आलीये. होकसे या गावाला ‘किडनी व्हॅली’ असंदेखील म्हटलं जातं.  सर्वाधिक लोकांनी घर खरेदी करण्याच्या नावाखाली आपली किडनी विकली आहे. यामधील अनेकांची घरे नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर उद्ध्वस्त झाली होती.  नेपाळमधील शक्‍तिशाली भूकंपानंतर या गावाकडे काठमांडूच्या मानवी अवयव तस्कारांचे लक्ष गेले. तुमच्या शरीरात पुन्हा नवी किडनी तयार होईल, अशी खोटी माहिती देत त्यांनी अनेक गावकर्‍यांना किडनी विकण्यासाठी तयार केले. यापैकी अनेकांची किडनी चक्‍क भारतात विकण्यात आली, अशी माहिती आता समोर आली आहे. एका किडनीच्या बदल्यात त्यांना एक-एक लाख रुपये देण्यात आले होते.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live