पोलिसकाका, माझे बाबा टीव्ही पाहतात, मला अभ्यास करू देत नाहीत

पोलिसकाका, माझे बाबा टीव्ही पाहतात, मला अभ्यास करू देत नाहीत

मुलं अभ्यास करत नाहीत, टीव्ही पाहतात.. तासंतास मोबाईल फोनवर गेम खेळत बसतात ही सर्वसामान्य पालकांची तक्रार. मात्र, जळगावच्या जामनेरमधल्या एका चिमुरड्यानं चक्क वडिलांची तक्रार पोलिसांत केली. इतकंच नाही तर वडिलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. माझा बाप मला अभ्यास करू देत नाही. टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, असं गाऱ्हाणं या मुलानं मांडलं.

अवघ्या 12 वर्षांच्या मुलाच्या या तक्रारीनंतर पोलिसही चांगलेच अवाक झाले. भर पावसात हा मुलगा पोलिस ठाण्यात आला, तेव्हा त्याच्या अंगावर केवळ हाफ पॅन्ट आणि बनियन होतं. वडील मिस्त्री काम करतात. आई शेतमजुरी करते. हा मुलगा त्याच्या दोन भावंडांसह आश्रमशाळेत शिकतो. पोलिसांनी या मुलाची सगळी माहिती जाणून घेतली. त्यानंतर या मुलाला घेऊन पोलिस कपड्यांच्या दुकानात गेले. त्याला कपडे घेऊन दिले. इतकंच काय, त्यानं सँडल नाही सांगितलं तर पोलिसांनी त्याला नवी कोरी सँडलही घेऊन दिली. 

त्यानंतर पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावत या मुलाच्या पालकांना बोलावलं. त्यांना समजावलं.

या घटनेतून पोलिसांची माणुसकी दिसलीच. तुम्हीही पोरांचा अभ्यास सुरू असताना, लाडकी सीरियल किंवा क्रिकेट मॅच पाहात असाल तर सावध राहा. तुमची मुलंही तुम्हाला पोलिस स्टेशनची हवा खायला लावू शकतात. 

WebTitle : marathi news kid's complained police about his father and his habit of watching TV 


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com