'पूंछ-राजौरी'मध्ये चकमकीत औरंगाबाद किरण थोरात यांना वीरमरण 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 एप्रिल 2018

जम्मू-काश्मिरच्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्ताननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बुधवारी भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात औरंगाबाद जिल्ह्याचे 31 वर्षीय किरण पोपटराव थोरात यांना वीरमरण आलंय.. लष्कराच्या प्रवक्त्यांनी बुधवारी रात्री उशिरा याबाबत माहिती दिलीय. थोरात हे वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी इथले रहिवासी होते. कृष्णा घाटी सेक्टरमधील चकमकीत मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे किरण थोरात गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आरती आणि नातेवाईक आहेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live