फ्लॅटधारकांनो कन्व्हेन्स डीड करा, अन्यथा हक्काच्या फ्लॅटला मुकाल

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर 
सोमवार, 29 जुलै 2019

तुम्ही आम्ही फ्लॅट खरेदी करतो. बिल्डरसोबत खरेदीचे व्यवहार झाल्यानंतर त्याची रितसर कागदपत्रंही घेतो. फ्लँट रजिस्ट्रेशननं, सोसायटी, शेअर सर्टिफिकेट अशा प्रक्रियेतही आपलं नाव असतं. पण हे सगळं झालं म्हणजे तुमचा फ्लॅट तुमच्या मालकीचा झाला असं नाही. कारण या सर्व प्रक्रियेत  कन्व्हेन्स डीड होणंही तितकच आवशल्यक आहे. कारण नुसती फ्लॅटची मालकी पुरेशी नाही. तर ज्या जागेवर इमारत उभी आहे त्या जागेचा मालकी हक्कही फ्लॅटधारकाकडे असायला हवा...मुंबईत असाच एक प्रकार घडलाय. गोरेगावमधील एक इमारत तीन वर्षांपूर्वी कोसळली.

तुम्ही आम्ही फ्लॅट खरेदी करतो. बिल्डरसोबत खरेदीचे व्यवहार झाल्यानंतर त्याची रितसर कागदपत्रंही घेतो. फ्लँट रजिस्ट्रेशननं, सोसायटी, शेअर सर्टिफिकेट अशा प्रक्रियेतही आपलं नाव असतं. पण हे सगळं झालं म्हणजे तुमचा फ्लॅट तुमच्या मालकीचा झाला असं नाही. कारण या सर्व प्रक्रियेत  कन्व्हेन्स डीड होणंही तितकच आवशल्यक आहे. कारण नुसती फ्लॅटची मालकी पुरेशी नाही. तर ज्या जागेवर इमारत उभी आहे त्या जागेचा मालकी हक्कही फ्लॅटधारकाकडे असायला हवा...मुंबईत असाच एक प्रकार घडलाय. गोरेगावमधील एक इमारत तीन वर्षांपूर्वी कोसळली. त्यानंतर बिल्डरने बिल्डिंग पुन्हा बांधून द्यावी यासाठी रहिवाशांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यावेळी कन्व्हेन्स डीडचा विषय आला आणि तिथेच फ्लॅटधारकांचा दावा कोसळला.

कसं कराल कन्व्हेन्स डीड? 

  • जमीन मालक, बिल्डर आणि फ्लॅटधारकात होणारा करार म्हणजे कन्व्हेन्स डीड
  • दुय्यम निबंधक कार्यालयाकडे केली जाते नोंदणी
  • बिल्डर किंवा जमीन मालकाने नकार दिल्यास 
  • जिल्हा उपनिबंधकांकडे डीम्ड कन्व्हेन्स करण्याची सुविधा
  • त्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख अथवा तलाठ्याकडे होते फेरफार नोंदणी...
  • त्यानंतर सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्डावर नोंदा होऊन फ्लॅटधारकाला मिळतो पूर्णता मालकी हक्क 
  • प्रचलित कायद्यानुसार भोगवटा प्रमाणपत्र आल्यानंतर बिल्डरने सहा महिन्यांच्या आत सोसायटीच्या नावे अभिहस्तांतरण पत्र करणे आवश्यक 
  • बिल्डरने टाळाटाळ केल्यास मोफा अंतर्गत दाखल होऊ शकतो गुन्हा

त्यामुळे तुम्ही फ्लॅटधारक असाल तर कन्व्हेन्स डीडबाबत टाळाटाळ करून नका. अन्यथा तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरावर पाणी सोडावं लागेल.

WebTitle : marathi news know everything about conveyance deed 


संबंधित बातम्या

Saam TV Live