मित्रपक्ष भाजपकडूनच शिवसेनेला धोका?

मित्रपक्ष भाजपकडूनच शिवसेनेला धोका?

सध्या भाजपचा वारू चौखूर उधळलाय. येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधल्या आयारामांना आपल्या डेऱ्यात सामील करून भाजपनं आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत असलेला भाजप मित्रपक्ष शिवसेनेलाही संपवतोय की काय असा प्रश्न सध्याच्या घडामोडी पाहून उपस्थित होतो.


भाजप-शिवसेना एकमेकांना नैसर्गिक मित्र म्हणतात. लोकसभेत अवघ्या दोन जागा जिंकलेल्या भाजपला 1989मध्ये सेनेशी युती झाल्यानंतर अच्छे दिन आले,हे भाजपही नाकारणार नाही..महाराष्ट्रात विस्तारण्यास भाजपला सेनेची मदत झाली. सेनेनं नेहमीच मोठ्या भावाची भूमिका घेतली.


मात्र,त्यांचं जागावाटपाचं घोडं अद्यापही अडलंय. शिवसेना फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर ठाम आहे. मात्र, भाजप शिवसेनेला 120 पेक्षा एक अधिक जागा सोडायला नाही असं सूत्रांकडून सांगण्यात येतंय.

आतापर्यंतचं शिवसेना-भाजपचं जागावाटप पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल.

  • 1990 मध्ये शिवसेनेने 183 तर भाजपाने 105 जागा लढविल्या 
  • 1995 मध्ये शिवसेनेने 183 तर भाजपाने 105
  • 1999 मध्ये शिवसेनेने 161 तर भाजपाने 117
  • 2004 मध्ये शिवसेनेने 163 तर भाजपाने 111 जागा
  • 2009 मध्ये शिवसेनेने 160 तर भाजपाने 109 जागा लढविल्या होत्या. 

आता हे समीकरण उलटं करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. भाजपच्या या रणनीतीसाठी गोव्यातल्या महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचं उदाहरण दिलं जातं. गोव्यात 1963 ते 1979 या काळात सत्तेवर असलेल्या मगोपशी 1994 मध्ये भाजपनं युती केली..त्यावेळी मगोपनं 25 तर भाजपनं 12 जागा लढवल्या. 2012मध्ये पुन्हा ही युती झाली. मात्र, भाजपनं आपले पाय गोव्यात रोवले होते. त्यांनी यावेळी 28 जागा लढवल्या तर मगोपला केवळ 7 जागा दिल्या. इतकंच काय तर गेल्या वर्षी मगोपच्या 3 आमदारांपैकी 2 आमदारांनी चक्क आपला गट भाजपात विसर्जित केला. मगोपचं अस्तित्वच जवळपास संपुष्टात आलं. महाराष्ट्रातही हा कित्ता भाजप गिरवू शकते, असं बोललं जातंय.

WebTitle : marathi news know why shivsena has threat from their alliance party BJP

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com