कोहिनूर मिल खरेदी प्रकरणाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या रडारवर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावलीय. शनिवारी संध्याकाळी बजावलेल्या या नोटीशीद्वारे ईडीने राज यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलंय. तर या प्रकल्पातील आणखी एक भागिदार आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पूत्र उन्मेष जोशींची सोमवारी ईडीने चौकशी केली. 

हे प्रकरण आहे दादरच्या अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक ३ च्या खरेदी व्यवहाराचं.

तब्बल 860 कोटींच्या या खरेदी व्यवहारात अनियमितता झाल्याचा ईडीला संशय आहे. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर या तीन भागिदारांद्वारे 421 कोटींमध्ये कोहिनूर मिलच्या जागेची खरेदी करण्यात आली होती. त्यावेळी IL&FS या वित्त कंपनीने या प्रकल्पात 225 कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र 2008 साली या कंपनीने तोटा पत्करून अवघ्या 90 कोटीत आपला हिस्सा हस्तांतरीत केला होता. त्याच वर्षी राज ठाकरेंनीही या प्रकल्पातला आपला हिस्सा विकून बाहेर पडलं होतं. विशेष म्हणजे आपला हिस्सा हस्तांतरीत केल्यानंतरही IL&FS ने या प्रकल्पासाठी पुन्हा आगाऊ कर्ज दिलं होतं.  मात्र या कर्जाची परतफेड न झाल्याने 2011 साली IL&FS ला कोहिनूर स्क्वेअरमधील काही व्यावसायिक आणि रहिवाशी वापरासाठीचे गाळे देऊ करण्यात आले, ज्याची किंमत  500 कोटी रुपये इतकी होती. या व्यवहारानंतरही पुन्हा IL&FS ने 2017 मध्ये पुन्हा या प्रकल्पासाठी 135 रुपयांचं कर्ज देऊ केलं, ज्याची अद्याप परतफेड होऊ शकलेली नाही.

हा संपुर्ण व्यवहार संशयास्पद असल्याचा ईडीला संशय असून काही दिवसांपुर्वी कोहिनूर प्रकल्पाच्या मुख्य वित्तिय अधिकाऱ्याची या प्रकरणी चौकशी करण्यात आलीय. तर आता उन्मेष जोशी आणि राज ठाकरे हे ईडीच्या रडारवर असून या दोघांच्या चौकशीनंतरच हे प्रकरण कसं वळण घेणार याचा अंदाज घेता येईल...रामनाथ दवणे, साम टीव्ही मुंबई
 
संबंधित बातम्या

Saam TV Live