कोल्हापुरातील जमावबंदीचा आदेश रद्द

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याच्या भीतीमुळे लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे. बंदीच्या आदेशावर चोहोबाजूने टीका झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर पोलिस अधिक्षकांनी सोमवार (ता. १२) ते शनिवारी (ता. २४ ऑगस्ट) रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला होता. या आदेशावर सर्वच विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली. अखेर सोमवारी रात्रीच अपर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी बंदीचा आदेश रद्द करण्याचे पत्रक प्रसिद्ध केले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला. सर्व जिल्ह्यातील जनजीवन यामुळे विस्कळित झाले आहे. यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून जिवनाश्यक वस्तूंसाठी धडपड सुरु आहे. अशातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची भीतीमुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला होता. आता तो रद्द करण्यात आला आहे.

Web Title: Kolhapur district orders ban is cancelled

संबंधित बातम्या

Saam TV Live