करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज नगरप्रदक्षिणा..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - नवरात्रोत्सवातील मुख्य दिवस आज (ता. १७) असून, अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची उत्सवमूर्ती वाहनात विराजमान होऊन भाविकांच्या भेटीसाठी बाहेर पडेल. 

रात्री बारानंतर जागर महापूजेला प्रारंभ होईल.नगरप्रदक्षिणेसाठी गुजरी मार्ग विद्युतरोषणाईने उजळून निघाला आहे. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, गुरू महाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिरामार्गे पुन्हा महाद्वार असा नगरप्रदक्षिणेचा मार्ग असेल. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातही अष्टमीच्या जागराची तयारी पूर्ण झाली आहे. दिवसभर मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे.   

दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. नारसिंही किंवा भद्रकाली नावाने ओळखली जाणारी ही देवता शरभेश्‍वर शिवाची शक्ती. काळ्या विद्येचे निराकरण करणारी म्हणून प्रत्यंगिरा, असे या पूजेचे माहात्म्य असल्याचे श्रीपूजक सारंग मुनीश्‍वर, स्वानंद मुनीश्‍वर, माधव मुनीश्‍वर यांनी सांगितले. शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने भवानी मातेच्या जागरानिमित्त बुधवारी (ता. १७) रात्री आठ वाजता आतषबाजी होणार आहे. 

Web Link : marathi news kolhapur ambabai nagar pradakshina 

संबंधित बातम्या

Saam TV Live