तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात प्रवेश बंदी 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या आवारात येताना भाविकांनी भारतीय पोशाखच परिधान करून यावे. तसेच पुरुष आणि महिलांनी शर्ट, पॅंट परिधान करून येण्यास मात्र परवानगी दिली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीत याबाबतचा ठराव झाला, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नवरात्र उत्सवाची माहिती देण्यासाठी मंदिराच्या गरुड मंडपात पत्रकार परिषद झाली. 

या नव्या नियमाची नवरात्रोत्सवापासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. सुरुवातीला तोकड्या कपड्यात येणाऱ्या भाविकांना देवस्थान समितीच्या निर्णयाची कल्पना दिली जाईल. सुरुवातीला काही दिवस सूचना दिल्या जातील. नंतर मात्र या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल. ज्या भाविकांना मंदिरात येण्यासाठी भारतीय पोशाख परिधान करायचा आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली व अन्य व्यवस्था करण्यात येईल. भारतीय पोशाखात शर्ट आणि पॅंट यांना परवानगी दिली असून जीन्स कपडेही परिधान करता येणार आहे. पण तोकडे कपडे परिधान करून मंदिरात येता येणार नाही.

या कपड्यांना परवानगी
शर्ट, पॅंट, टी शर्ट यासह सर्व प्रकारचे पोशाख परिधान करून भाविक मंदिरात येऊ शकतात. संपूर्ण कपड्यातील भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. 

या कपड्यांना प्रवेश निषिद्ध 
हाफ पॅंट, थ्री फोर्थ, बिन बाह्याचे शर्ट व टॉप्स, मिनी स्कर्ट हा पोशाख परिधान करून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

WebTitle : marathi news kolhapur ambabai temple new rules for devotees 

संबंधित बातम्या

Saam TV Live