इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये उत्खनन ; ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये उत्खनन ; ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर - सुळेरान (ता. आजरा) येथे इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये उत्खनन करणाऱ्या चौघांवर खनिकर्म विभागाने आज कारवाई केली. कारवाईत चार क्रशर सील करण्यात आले. चार पोकलॅन, डंपर व एक हजार ब्रास खडी असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी अमोल थोरात व निरीक्षक विजय बुराण यांनी ही कारवाई केली. 

सुळेरान इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे. दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणी सुरू असलेले बेकायदेशीर उत्खनन बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यान, जिल्हा प्रशासनानेही यावेळी कारवाई केली होती. आज या ठिकाणी पुन्हा उत्खनन सुरू असल्याची तक्रार आली. त्यानुसार आग्नेल फर्नांडिस, डिकोस्टा फर्नांडिस व आनंदा डोंगरे (तिघेही रा. घाटकरवाडी), अप्पा खेडेकर व बाळकृष्ण पाटील (सुळेरान) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सकाळी ११ पासून सायंकाळी पाचपर्यंत सुरू असलेल्या कारवाईमुळे आजरा परिसरात खळबळ उडाली. कारवाईमध्ये अवैध उत्खनन करून गौण खनिजाचा साठा केला होता. तो साठा जप्त करण्यात आला. 

अवैध उत्खनन करणाऱ्या एका पोकलॅनसाठी साडेसात लाखांचा दंड आहे. त्यामुळे चार पोकलॅनपोटी २८ लाख दंड भरावा लागणार आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, खनिकर्म निरीक्षक विजय बुराण, आजऱ्याचे नायब तहसीलदार कोळी उपस्थित होते.

सुळेरान येथे बेकायदा उत्खनन सुरू असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार कारवाई केली. यात सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या पुढील कारवाई तहसीलदार गुरुवारी सुरू ठेवतील.
- विजय बुराण, 
खनिकर्म निरीक्षक

Web Title: kolhapur An amount of Rs 40 lakh was seized from the ecological zones of Suleran

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com