जावयानं केला पत्नीसह सासू सासऱ्यांवर जीवघेणा हल्ला; सासऱ्यांचा मृत्यू, पत्नी आणि सासू गंभीर जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

जावयाने पत्नीसह सासू - सासऱ्यावर हल्ला केलाय.  कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचं समजतंय. इचलकरंजीच्या जवाहरनगरमधल्या कोरवी गल्लीत ही खळबळजनक घटना घडलीय.

हल्ल्यात सासरा धोंडीराम रावण जागीच ठार झाला असून सासू राधा रावण, पत्नी रुपाली पाटील गंभीर जखमी झालेत. या हल्ल्यातून त्यांची छोटी मुलगी थोडक्यात बचावलीय. हल्लेखोर आरोपी अनिल पाटील हा सध्या फरार आहे... शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live