(VIDEO) पत्नीच्या चारित्र्यावर संशय; माथेफिरु जावयाने सासरचं कुटुंबच संपवलं 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

कौटुंबिक वादातून शिरोळे तालुक्यातील यड्रावच्या शिरगावे मळ्यात माथेफिरु जावयाने सासरचं कुटुंबच संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जावयाने यंत्रमागाच्या दांडक्याने केलेल्या हल्ल्यात सासू छाया धुमाळ-आयरेकर आणि मेहुणी सोनाली रावण जागीच ठार झाले. तर, उपचारादरम्यान पत्नी रुपाली आणि गंभीर जखमी मेव्हणा रोहित यांनी अखेरचा श्वास घेतला. आरोपी जावई प्रदीप हा नेहमीच त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातच तो मद्याच्याही आहारी गेला होता. हल्लेखोर जावई प्रदीप जगताप फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. 

WebTitle :  marathi news kolhapur crime psycho son in law killed all in laws in kolhapur 

संबंधित बातम्या

Saam TV Live