कोल्हापूरकरांनो सावधान ; कोल्हापुरात डेंग्यूने चौघांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कोल्हापूर शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यूच्या डासांचा सुळसुळाट झाला आहे. स्वच्छ पाण्यात अंडी घालणाऱ्या आणि दिवसा नागरिकांना चावणाऱ्या या डासांचा बीमोड करणे महापालिकेच्या आरोग्य विभागासह शहरवासीयांना अशक्य झाले आहे. त्यामुळे  कोल्हापुरात डेंग्यूने आतापर्यंत चौघांचा मृत्यू झालाय.

डेंग्यूचे डास शहरवासीयांची पाठ काही सोडता सोडायला तयार नाहीत. जुने रुग्ण बरे होतात न होतात तोच नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चार दिवसांत शहरात डेंग्यूचे ३४ नवीन, तर १५ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने या आजाराचा आणि डासांचा प्रभाव आजही कायम असल्याचे दिसून आले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live