कर्नाटकातील जिल्ह्यांना कोल्हापुरी चप्पलांचं GI मानांकन कशासाठी ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

जगात भारी कोल्हापुरी
- अत्यंत दर्जेदार चामड्यापासून बनवली जाते कोल्हापुरी चप्पल
- चप्पलेची खासियत त्यावर केलं जाणारं नक्षीकाम
- कोल्हापूरी चपलांमुळं अंगातली उष्णता शोषून घेते
- आरोग्यदायी चप्पल असा लौकीक
- परदेशातुनही कोल्हापूरी चपलांना मागणी

कोल्हापुरी चप्पल.. प्रत्येकाच्या कलेक्शनमध्ये एक तरी कोल्हापुरी चप्पल असतेच असते नाही का? या कोल्हापुरीचा रुबाबच न्यारा आहे, चप्पल घातलीच की कसं भारी वाटतं, जवळपास सगळ्यांनाच असा अनुभव येतो नाही का? पण गेल्या काही वर्षांमध्ये कोल्हापुरी चपलांच्या नावानं कोणतीही चप्पल खपवण्याचे प्रकार सुरु होते. त्यामुळंच कोल्हापुरी चपलांना जीआय मानांकन मिळावं यासाठी लढा सुरु होता. अखेर या लढ्याला यश आलं आणि कोल्हापुरी चपलांना जीआय मानांकन मिळालं, पण कर्नाटकातल्या ४ जिल्ह्यांनाही जीआय मानांकन मिळाल्यानं कोल्हापुरकर नाराज आहेत.

जगात भारी कोल्हापुरी
- अत्यंत दर्जेदार चामड्यापासून बनवली जाते कोल्हापुरी चप्पल
- चप्पलेची खासियत त्यावर केलं जाणारं नक्षीकाम
- कोल्हापूरी चपलांमुळं अंगातली उष्णता शोषून घेते
- आरोग्यदायी चप्पल असा लौकीक
- परदेशातुनही कोल्हापूरी चपलांना मागणी

कोल्हापूरी चप्पल ही मुळची कोल्हापूरची ओळख आहे. त्याचा इतर जिल्ह्यांशी संबंध नाही. त्यामुळं इतर जिल्ह्यांचं जीआय मानांकन वगळावं अशी मागणी होतेय. कोल्हापूरी चप्पलला जी आय मानाकंन मिळणं अभिमास्पद गोष्ट आहे. त्यामुळं या व्यवसायाला चांगले दिवस येतील. 

WebTitle : marathi news kolhapur gets GI rating for kolhapuri chappals  

 


संबंधित बातम्या

Saam TV Live