गुढी पाडवा मुर्हुतावर कोल्हापूरात गुळ सौदे

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 मार्च 2018

कोल्हापूर - गुढी पाडव्याच्या मुर्हुतावर शाहू मार्केट यार्डात गुळ बाजारात झालेल्या मुहुर्ताच्या सौद्यात 2800 ते 5100 असा प्रती क्विंटल भाव मिळाले बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील यांच्या हस्ते व उपसभापती अमित कांबळे यांच्या उपस्थित सौदे काढण्यात आले हे सौदे साताप्पा बुरगे यांच्या अडत दुकानात झाले. 

यंदाच्या गुळ हंगामात जवळपास 25 लाख गुळ रव्यांचे सौदे झाले आहेत. नव्याने गुळ या बाजारपेठेत येत आहेत. अशात लहान गुळाला सर्वाधिक मागणी असल्याने एक किलो - दोन किलोचे गुळ रवे बाजारात येत आहेत. तसेच परंपरागत दहा किलो ते तीस किलोपर्यंतचे गुळ रवे बाजारात येतात. या गुळाला गुजरातमधून सर्वाधिक मागणी आहे.

गेल्या कांही वर्षात अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुऱ्हाळ घरे बंद होत आहेत. यात गेल्या दहा वर्षात गुळाचे भावही कमी आले. त्यामुळे अनेक गुऱ्हाळ घरे बंद झाली. मात्र गेल्या दोन वर्षापासून गुळाला चांगला भाव मिळत असल्याने गुळाच्या आवकेत वाढ होतानाही पाहायला मिळत आहे. 

गुढीपाडव्याच्या परंपरंनुसार बाजार समितीमध्ये आज पाडवा मुर्हुतावर गुळ सौदे झाले. यात 2 हजार 800 ते 5 हजार 100 असा भाव मिळाला हा भाव हंगामाच्या अखेरपर्यंत टिकून रहाण्यासाठी चांगल्या प्रतीचा गुळ बाजारात येणे महत्वाचे आहे असे मत व्यक्त करण्यात आले. या वेळी बाजार समिती सदस्य विलास साठे, उत्तम धुमाळ, बाबूराव खोत, शेतकरी प्रतिनिधी भगवान काटे, किरण पाटील, आनंदराव पाटील, सचिव मोहन सालपे, उपसचिव राजेंद्र मंडलीक, रामचंद्र खाडे गुळ उत्पादक शेतकरी अडते व्यापारी, माथाडी कामगार आदी उपस्थित होते. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live