Loksabha 2019 : खासदार धनंजय महाडिक यांनी अर्ज केला दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 एप्रिल 2019

कोल्हापूर - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी ( ता .1) खासदार धनंजय महाडिक यांनी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार राजू शेटटी, आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार हसन मुश्रीफ, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे उपस्थित होते.

ठरल्याप्रमाणे आज अगदी साधेपणात खासदार महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरतेवेळी खासदार राजू शेट्टी येणार असल्याने  त्यांची वाट पाहत बऱ्याचवेळ नेतेमंडळींना ताटकळत उभे राहावे लागले.

बास्केटब्रिज असते तर आले असते 
खासदार शेट्टींना विलंब होत असल्याबददल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे विचारणा केली. यावर खासदार शेट्टी तावडे हॉटेल, कावळा नाका येथे पोहोचले असल्याचे सांगण्यात येत आहे, असे महाडिक यांनी सांगितले. यावर, बास्केट ब्रिज झाले असते तर ते लवकर पोहोचले असते, असा टोला श्री. पाटील यांनी महाडिक यांना लावताच सर्वत्र हशा पिकला. 

खासदार शेट्टींनी धडकी वाढवली 
खासदार महाडिक यांचा अर्ज भरण्यासाठी सर्वच नेतेमंडळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारत उपस्थित होती. मात्र खासदार राजू शेट्टी येणार असल्याने सर्वजण त्यांची वाट पाहत ताटकळत उभे होते. वारंवार खासदार शेट्टी यांना फोन करुन किती वेळात पोहोचणार, याची विचारणा केली जात होती. अखेर आमदार मुश्रीफ यांनीच, चला आता अर्ज दाखल करुया, अशी सुचना केली आणि सर्व नेते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. स्वाभिमानीकडून भगवान काटे अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. दरम्यान खासदार शेट्टींचे तेथे आगमन झाले. ते अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले व भगवान काटे यांना बाहेर यावे लागले. जवळपास अर्धा तासापेक्षा अधिकवेळ सर्वच नेत्यांना खासदार शेट्टींमुळे ताटकळत उभे रहावे लागले, याची चांगलीच चर्चा सुरु होती. 

\Web Title: Loksabha 2019 Kolhapur Lok Sabha Constituency MP Mahadik fill form

संबंधित बातम्या

Saam TV Live