दररोज राज्यातील एक मोठे घराणं भाजपसोबत येणार - चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

कोल्हापूर - दररोज राज्यातील एक मोठे घराणे भाजपसोबत येणार आहे. आता उत्तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असून तेथील एक घराणे भाजपमध्ये येणार आहे. तर परवा सोलापूरातील एक घराणे भाजपमध्ये येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोल्हापूर - दररोज राज्यातील एक मोठे घराणे भाजपसोबत येणार आहे. आता उत्तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असून तेथील एक घराणे भाजपमध्ये येणार आहे. तर परवा सोलापूरातील एक घराणे भाजपमध्ये येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. श्री पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील मोठी घराणी भारतीय जनता पक्षामध्ये दाखल होणार आहेत. पक्षाची ताकद वाढणार आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील एक घराणे पक्षात आलेले तुम्हाला लवकरच पहायला मिळेल. तर सोलापूरातील एक घराणेही दाखल होईल. 

श्री. पाटील म्हणाले, महाभारतामध्ये स्वकीयांशाची युध्द करताना अर्जूनाची जी अवस्था झाली, तीच अवस्था माझी, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक आणि आमदार अमंल महाडीक अशा तिघांची झाली आहे. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जूनाची ही कोंडी सोडविली आणि धर्मासाठी लढ असे अर्जूनाला सांगीतले. आम्हा तिघांनाही आता ही व्दिधा स्थिती सोडून तेच करावे लागणार आहे. समोर खासदार धनंजय महाडीक हा परममित्र लढत असताना आम्हालाही युतीधर्मच पाळत प्रा. संजय मंडलिक यांना ताकदीने निवडून आणण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना पंतपधान करण्यासाठी लढावे लागणार आहे, 

श्री. पाटील म्हणाले, आयुष्यात खूप कमी वेळा असे अवघड प्रसंग येतात. असे अवघड प्रसंग आम्हा तिघांवर आले आहेत. धनंजय महाडीक हे माझे परममित्र आहेत. अमंल महाडीक यांचे ते भाऊ आहेत. तर अध्यक्षा शौमिका महाडीक यांचे ते दीर आहेत. महाडीक हे राष्ट्रवादीतून लढत आहेत. आम्ही मात्र भाजपचे खंदे कार्यकर्ते आहोत, पक्षाला दिशा देणारे आहोत. धनंजय महाडीक समोर असल्याने आमची व्दिधा मनस्थिती होती. पण जे अर्जूनाने केले, तेच आम्हाला करावे लागणार आहे. शेवटी युतीधर्म महत्वाचा आहे. म्हणून आम्ही मोठ्या ताकदीने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या मागे उभे राहणार आहोत. धनंजय महाडीकच शिवसेनेचे उमेदवार असावेत, यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. 

Web Title: Minister Chandrakantdada Patil comment


संबंधित बातम्या

Saam TV Live