काँग्रेसच्या शोभा बोंद्रे कोल्हापूरच्या नव्या महापाैर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 मे 2018

कोल्हापूर - काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची कोल्हापूरच्या ४२ व्या महापाैर म्हणून निवड झाली आहे. महापालिकेत आज महापाैरपदासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांच्या उपस्थितीत निवडणूक झाली.

कोल्हापूर - काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची कोल्हापूरच्या ४२ व्या महापाैर म्हणून निवड झाली आहे. महापालिकेत आज महापाैरपदासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांच्या उपस्थितीत निवडणूक झाली.

शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांनी माघार घेतल्याने भाजप-ताराराणी आघाडीच्या रूपाराणी निकम आणि काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांच्या लढत झाली. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती महापालिकेत आहे. या आघाडीचे ४४ हे संख्याबळ आहे. तर भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ संख्याबळ आहे. या निवडणूकीत हीच स्थिती कायम राहिली. यामुळे शोभा बोंद्रे यांची निवड झाली. शिवसेनेने या निवडणूकीतून माघार घेतली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live