एकदा वाचाच! नादच खुळा! कोरोनाचं संकट त्यात गटारीचा धिंगाणा 

साम टीव्ही
रविवार, 19 जुलै 2020

कसा हाय नुसता राडा...
कोरोनाचं संकट त्यात गटारीचा धिंगाणा 
कुठं अंडी, कुठं मासं, कुठं चिकन, तर कुठ मटन
आरारारारा .... खतरनाक... 
हौसला मोल नाय अन् मटनाला हाड नाय...

कसा हाय नुसता राडा...
कोरोनाचं संकट त्यात गटारीचा धिंगाणा 
कुठं अंडी, कुठं मासं, कुठं चिकन, तर कुठ मटन
आरारारारा .... खतरनाक... 
हौसला मोल नाय अन् मटनाला हाड नाय...

ही आपलं कोल्हापूर.... पुरे पुर कोल्हापूर... 
इथं तांबड्या पांढऱ्याचा बेत सुरु हाय ... सकाळपासनंच रांगा लागल्या मटनाच्या दुकाना पुढं. 
इथ कुठलाचं कारभार ढिल्ला नाय ... अन् कुणाला सुट्टी नाय ... एकदम काटा किर्रररर कारभार. कोरोनाच्या पेकटात लाथ घालून ... समद्या मंडळींचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू हाय भावड्या... खावा वरपूर...
पुढचे साता दिवस कोल्हापुरात लॉकडाऊन हाय...  कोल्हापुरातनं आपली गाड्या पुण्याकडं घिवुया....

पुणे तिथं काय उणे .... इथं उण्याचा उद्योग नाय दोस्ता... इथं कोरोनाला दिलाय धक्का... आता मटनाचा बेत पक्का.. सोशल डिस्टसिंग पाळत पुणेकरांनी इथं  लावल्यात रांगा... त्या रैवार अन् गटारी असं योगायोग... मग हा योगायोगाला नमस्कार करतं पुणेकरांनी आखाला तिकटाचा बेत.... तिकटाचा बेत म्हणल्यावर चव वाढवायला लिंबू पाहिजी. कसलीच कमी पडायला नग... परत श्रावण पाळायचा हाय .. त्यो पण कडक.. एकदम लॉकडाऊन सारखा.. 

बर आता मुंबईला जाऊया जिवाची मुंबई करु.. अन् कोरोनाला हारवू... मुंबईची रित न्यारी त्याच आज मटन अन् चिकन संग लालबूंद तरी... इथ गटारीची मज्जा असती भावा... पावसानं झोडपून काढलंय त्या कोरोनाचा कहर मग थोडी अंगात ताकद वाढवायला पाहिजी अन् त्यात आषाढच्या शेवटात गटारीचा मौसम...मग लागा तयारीला अन् फोडा नळ्या...  

बरं दोस्तो... कोकणात, मराठवाड्यात, विदर्भात गुमानं गटारी उत्सव सुरु आहे... पण एक ध्यानात ठेवा नियम पाळायचं हायतं... कोरोनासंग लढाई लढायची हाय आपल्याला... आजून मोठा पल्ला पार करायचा.. मग काळजी घ्या... कोरोनानं घेतलंय आपल्यासंग वाकडं मग पोचवूया कोरोनाची नदीवर लाकडं .. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live