गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणाबाजी, दगफेक आणि चपलांची फेकाफेक; अवघ्या 3 मिनिटांत सभा संपली 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

कोल्हापूरमध्ये सुरू झालेली गोकूळ दूध संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा अवध्या 3 मिनिटांत गुंडाळण्याची नामुष्की संचालक मंडळावर आली. अपेक्षेप्रमाणे गोंधळातच या सभेला सुरुवात झाली.

कोल्हापूरमध्ये सुरू झालेली गोकूळ दूध संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा अवध्या 3 मिनिटांत गुंडाळण्याची नामुष्की संचालक मंडळावर आली. अपेक्षेप्रमाणे गोंधळातच या सभेला सुरुवात झाली.

संचालक मंडळाने ठराव मांडताच, सतेज पाटील यांनी स्टेजजवळ येण्याचा प्रयत्न केला. 
तसंच विरोधक सभासदांनीही घोषणाबाजीस सुरुवात केली. यामुळे तात्काळ वातावरण तापलं. अन् क्षणार्धात दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजींनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. इतक्यात विरोधक सदस्यांकडून चप्पलफेक होताच. सभास्थळी राड्यास सुरुवात झाली. अन् स्टेजजवळ बसलेल्या सत्ताधारी सभासदांनीही घोषणाबाजीकरत चपला भिरकावल्या. या गोंधळातच ठराव मांडण्यात आला. 

अन् सत्ताधाऱ्यांनी या गोंधळाचा फायदा घेत, ठराव मंजूर केल्याचा दावा केला. अन् राष्ट्रगीतासह सभा रद्द केली.  सकाळी 11 वाजताची सभेची वेळ असतानाच, सत्ताधारी गटाचे सभासद सकाळी 8 वाजताच सभास्थळी हजर झाले.. जेणेकरुन विरोधकांना व्यासपीठापासून दूर ठेवता येईल. त्यानंतर सकाळी 9.30च्या सुमारास आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी शक्तिप्रदर्शनदेखील केलं.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live