'कागल' विधानसभेचे मतदान हे मतपत्रिकेद्वारेच होणार : हसन मुश्रीफ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जून 2019

कोल्हापूर : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्राचे काय व्हायचे ते होऊ दे, पण कागल विधानसभेचे मतदान हे मतपत्रिकेद्वारेच होईल, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी आज दिला.  

कागल विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्री. मुश्रीफ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले,"कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात जे घडले नाही ते या सरकारकडून घडवले जात आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्‍न बाजूला पडत आहेत, पण त्याचवेळी नको ते प्रश्‍न पुढे केले जात आहेत. दुसऱ्या पक्षातील वजनदार नेत्यांना फोडायचे आणि स्वतःचा पक्ष बलवान करण्याचे स्वप्न भाजपाचे नेते बघत आहेत. पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनताच या सरकारला चोख उत्तर देईल.' 

लोकसभेच्या निकालानंतर इलेक्‍ट्रॉनिक यंत्राविषयी उलसुलट चर्चा होत असल्याच्या पार्श्‍वभुमीवर श्री. मुश्रीफ म्हणाले,"इलेक्‍ट्रॉनिक यंत्राचे काय व्हायचे ते होऊ दे पण कागल विधानसभा निवडणूकीचे मतदान हे मतपत्रिकेद्वारेच होईल.'

Web Title : Polling for 'Kagal' Assembly will be done by ballot: Hasan Mushrif

संबंधित बातम्या

Saam TV Live