दोन किलो चांदीचे दागिने लंपास; कोल्हापूरतील कात्यायनी मंदिरात चोरी

दोन किलो चांदीचे दागिने लंपास; कोल्हापूरतील कात्यायनी मंदिरात चोरी

कोल्हापूर - कात्यायनी येथील देवी मंदिराचे लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी देवीचे दोन मुकुट पंचारती असे सुमारे दोन किलो वजनाची चांदीचे दागिने लंपास केले. आज पहाटे हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. करवीर पोलीस उपाधीक्ष सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असून करवीर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कात्यायनी देवी मंदिराला पुरातन महत्व आहे. बलिंगा येथील रामचंद्र विष्णू गुरव हे मंदिराचे पुजारी आहेत. मंदिर परिसरातच ते कुटुंबासह राहतात. आज पहाटे नेहमी प्रमाणे ते मंदिरात पूजेसाठी आले असता मंदिरातील लोखंडी दरवाजा तुटलेला दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता देवीच्या गाभाऱ्यातील संस्थान कालीन चांदीचे दोन मुकुट, पंचारती असा ऐवज लंपास झाला होता.  त्यांनी मंदिरा बाहेर येऊन पाहिले असता मंदिराच्या दर्शन मंडपात असलेले छोटे लाकडी दरवाजे व लोखंडी कपाट उचकटले होते.  चोरीचा प्रकार लक्षात येताच गुरव यांनी याची माहिती पोलीस तसेच बलिंगा येथील अध्यक्ष अमर जत्राटे यांना दिली 
घटनेबाबत समजताच करवीर पोलीस उपधीक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. चोरट्यानी मंदिरातील दोन चांदीची ताटे, देणगीची काही रक्कम तसेच पितळेची भांड्याना हात लावलेला नाही शिवाय गाभाऱ्यातील कपाटे कुलपं काढून चोरी झाली आहे. त्यामुळे चोरट्यांचा हेतू काय असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. घटनास्थळी श्वान पथकाला ही पाचारण करण्यात आले. श्वानाने मंदीराच्या आवरातून मुख्य रस्त्यापर्यत माग काढला.

सीसीटीव्ही बंद 
देवस्थान समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या या मंदिराचा परिसर निर्जन आहे. मंदिरात सुरक्षा रक्षक ही नसल्याने पुजारी गुरव यांनी स्वतः सहा सीसीटीव्ही बसवले आहेत.  मात्र गेल्या तीन दिवसापासून सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे एखाद्या माहीतगाराने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

Web Title: robbery in Katyayani temple

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com