विराटला पाहायचाय दुर्गराज रायगड किल्ला; छत्रपती संभाजीराजेंपुढे व्यक्त केली इच्छा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची आज पुण्यात भेट झाली. महाराष्ट्रातील क्रिकेटविषयी दोघांनी चर्चा केली. दरम्यान, विराटने दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

संभाजीराजे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी नुकतीच निवड झाली. या निवडीनंतर भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य जतीन परांजपे यांनी संभाजीराजेंची विराट कोहलीशी भेट घडवून आणली. या वेळी त्यांनी विराटसमवेत महाराष्ट्रातील क्रिकेटविषयी चर्चा केली. संभाजीराजे यांनी येत्या काळात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भरपूर काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील टॅलेंटेड खेळाडूंना योग्य संधी मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान, श्री. परांजपे यांनी कदाचित माझ्या सामाजिक कार्याविषयी व विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसाठी करत असलेल्या कामाची माहिती दिल्याची शक्‍यता होती. त्यामुळे विराटने स्वतः होऊन रायगड किल्ल्यावर येण्याची इच्छा व्यक्त केल्याचे, संभाजीराजे यांच्या फेसबुक पेजवर म्हटले आहे.

Web Title: SambhajiRaje Virat Kohali discussion on cricket in Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live