घोडागाडी शर्यत सुरु असताना असं काही घडल की सगळ्यांनीच श्वास रोखून धरला; पाहा थरारक व्हिडिओ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

कोल्हापुरात घोडागाडी स्पर्धेदरम्यान एक तरुण तोल जावून रस्त्यावर पडला. विशेष म्हणजे थोडक्यात या तरुणाचा जीव वाचलाय. ही घटना आहे कागल तालुक्यातल्या माद्याळ गावातली.

या गावात घोडागाडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत पहिला नंबर आला म्हणून तरुणानं चालत्या गाडीतच शड्डू ठोकण्याचा प्रयत्न केला. पण तोल गेल्यानं हा तरुण थेट रस्त्यावर पडला. त्यानंतर मागून येणारी अनेक वाहनं त्याला धडकली. आणि त्याच्या अंगावरुनही गेली. मात्र ही स्पर्धा पाहणाऱ्या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणाला रस्त्यावर बाजूला काढलं आणि त्याचा जीव वाचवला.

त्यामुळे थोडक्यात या तरुणाचा जीव वाचलाय. दरम्यान, या घटनेमुळे गावागावांमध्ये चालणाऱ्या घोडागाडी आणि बैलगाडीच्या स्पर्धांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live