Monsoon : कोल्हापुरात मुसळधार पाऊस, गगनबावडा मार्गवर वाहतूक बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जुलै 2019

कोल्हापूर - येथे रात्रभर धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मांडूकली गावाजवळ रस्त्यावर दीड फूट पाणी आले आहे. यामुळे या गगनबावडा मार्ग जाणारी वाहतूक बंद केली आहे. 

कळेमार्गे गगनबावडा जाणारी वाहतूक, तसेच कोल्हापूरकडून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वैभववाडीकडून येणारी वाहतूक गगनबावडा येथे थांबविण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. 

बाजार भोगाव व पोहाळेतर्फे बोरगाव येथे अंदाजे तीन फूट पाणी रस्त्यावर आले आहे. यामुळे येथील वाहतूकही बंद आहे.  पोहाळवाडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

पन्हाळा तालुक्यातील गोठे- परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी आल्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. लोंघे (ता. गगनबावडा) येथे रस्त्यापेक्षा दोन फूट पाणी आले असून पावसाचा जोर असाच राहील्यास या मार्गावरही पाणी येण्याची शक्यता आहे. 

Web Title: Heavy Rains in Kolhapur District Gaganbawada Road closed

संबंधित बातम्या

Saam TV Live