बंगालला गुजरात बनवण्याचा भाजपचा डाव : ममता बॅनर्जी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जून 2019

कोलकता : "भाजप बंगालचा गुजरात करू पाहत आहे. मी तुरुंगात जाण्यास तयार आहे; पण हे कदापि होऊ देणार नाही,'' असा इशारा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दिला. 

कोलकता : "भाजप बंगालचा गुजरात करू पाहत आहे. मी तुरुंगात जाण्यास तयार आहे; पण हे कदापि होऊ देणार नाही,'' असा इशारा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दिला. 

राज्यातील 19 व्या शतकातील समाजसुधारक ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकत्याच्या विद्यासागर महाविद्यालयात आज केले. त्या वेळी त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकत्यामधील "रोड शो'दरम्यान झालेल्या हिंसाचारात ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली होती. या पुतळ्याच्या जागी आता मूळच्या सफेद रंगातील फायबर ग्लासचा नवीन पुतळा उभारण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांनी हरे शाळेमध्ये याचे अनावरण केले. नंतर पुतळा खुल्या वाहनातून महाविद्यालयात हलविण्यात आला व पूर्वीच्याच ठिकाणी तो स्थापन करण्यात आला. 

या वेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, राज्यात निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात एकूण दहा जणांचा बळी गेला. यातील आठ जण तृणमूल कॉंग्रेसचे आहेत, तर दोन कार्यकर्ते भाजपचे आहेत. कोणाचाही मृत्यू हा दुर्दैवीच असतो. हिंसाचारात मृत्यू पावलेल्या सर्व दहा कार्यकर्त्यांच्या नातेवाइकांना आपत्कालीन व्यवस्थापन निधीतून मदत देण्याचा आदेश मुख्य सचिवांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अमित शहा यांच्यावर टीका करताना बॅनर्जी म्हणाल्या, "आमच्याकडील दस्तावेजांमध्ये सर्व काही आहे. त्यांनी विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड केल्याचे आम्हाला माहीत आहे. आता ते गृहमंत्री आहेत. गेरूच्या रंगाने तुम्ही भगवाधारी बनू शकत नाही. तृणमूल कॉंग्रेसने 34 वर्षांनंतर पश्‍चिम बंगालमधील निवडणुकीत विजय मिळविला; पण आम्ही लेनिन किंवा मार्क्‍स यांचे पुतळे फोडले नाहीत.''
 

WebTitle: Bengal will not be Gujarat says Mamta Banerjee


संबंधित बातम्या

Saam TV Live