'दीदीकेबोलोडॉटकॉम'वरून ममता बॅनर्जी ऐकणार नागरिकांच्या तक्रारी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जुलै 2019

कोलकाता : नागरिकांना तक्रारी करता याव्यात, तसेच गाऱ्हाणी मांडता यावीत यासाठी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'दीदीकेबोलोडॉटकॉम' (www.didikebolo.com) हे संकेतस्थळ आज सुरू केले. तसेच, 9137091370 हा भ्रमणध्वनी क्रमांकही कार्यान्वित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर ममता बॅनर्जी एकट्याच होत्या. नेहमीप्रमाणे तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांची गर्दी व्यासपीठावर नव्हती. पक्षाने सध्या राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांची सल्लासेवा घेतली असून, त्यांच्या सल्ल्यानुसारच ममतांची प्रतिमा भव्य-दिव्य करण्यासाठी त्या एकट्याच व्यासपीठावर होत्या, अशी चर्चा आहे. तृणमूल कॉंग्रेस आणि नागरिकांतील संबंध दृढ करण्यासाठी हे संकेतस्थळ सुरू करण्यात आल्याचे ममता बॅनर्जी यांनी या वेळी नमूद केले.

संकेतस्थळाच्या माध्यमातून पक्ष आधुनिक होत असल्याचे सांगून, पक्षाचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन नागरिकांबरोबर संवाद साधतील असेही त्या म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीला अद्याप वीस महिन्यांचा कालावधी असला, तरी यानिमित्ताने ममतांनी प्रचाराला सुरवात केल्याचे यातून दिसते. 

Web Title: Didi Ke Bolo Mamata Banerjee launches new campaign to reach out to people

संबंधित बातम्या

Saam TV Live