नाणारला होकार द्यावा यासाठी उद्धव ठाकरेंचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरुच

सरकारनामा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

राजापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'नाणारचा विषय संपला' असे जाहीर केले. मात्र, प्रकल्पाचे समर्थनही वाढू लागले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या समर्थनाची बाजू ठाकरे यांना समजाविणार असून प्रकल्पाच्यादृष्टीने त्यांची सकारात्मक भूमिका करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर आणि सचिव अविनाश महाजन यांनी दिली.

मुख्यमंत्री ठाकरे यांची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, प्रकल्प समर्थक आणि काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी लवकरच यासाठी भेट घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. नाणार प्रकल्पाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. सेनेने प्रकल्पविरोधात भूमिका घेतलेली असतानाही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाणारचे जोरदार समर्थन केले आहे. त्यातून, सेनांतर्गंत वाद चिघळला आहे. एका बाजूला नाणारला जास्त प्रमाणात विरोध असल्याचे सांगितले जात असताना गेल्या काही दिवसांमध्ये प्रकल्प समर्थकांची संख्याही वाढू लागली आहे. समर्थकांनी डोंगर तिठा येथे प्रकल्पाच्या समर्थनार्थ आंदोलन छेडले. प्रकल्प झालाच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

समर्थकांच्या या आग्रही भूमिकेनंतर छुप्या पद्धतीने प्रकल्प समर्थन करणारे आता उघडपणे समर्थनाची भूमिका बोलू लागले आहेत. त्यामध्ये व्यापारी संघटनांसह वकील, डॉक्‍टरवर्ग यांच्याकडूनही प्रकल्पाचे समर्थन केले जात आहे. आजपर्यंत प्रकल्प विरोधात असलेल्या काही राजकीय पक्षांनीही आता प्रकल्प समर्थन केले जावू लागले आहे. त्यातून, प्रकल्प समर्थकांची संख्या वाढू लागली आहे. प्रकल्प समर्थकांचा आवाज मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी लवकरच काही सामाजिक संघटना त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आंबेरकर यांनी दिली.

आता आमचे आम्हीच प्रयत्न करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आजपर्यंत खासदार, आमदार यांच्यामार्फत प्रयत्न केले होते. मात्र, त्यांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता आमचे आम्हीच प्रयत्न करीत असून लवकरच भेट घेवू, अशी माहिती आंबेरकर यांनी दिली.

Web Title konakan associations meet uddhav thackeray nanar

संबंधित बातम्या

Saam TV Live