मालवणच्या समुद्राच्या लाटांमध्ये लखलखाट!! 

कृष्णकांत साळगावकर, साम टीव्ही, सिंधुदुर्ग  
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मालवणमधल्या समुद्रात सध्या लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया अनुभवायला मिळतेय. समुद्राच्या रंगीत लाटा हा सध्या पर्यटकांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय.

समुद्राच्या लाटा चक्क रंगीत झाल्यात. अंधारात मधूनच चकाकणाऱ्या या रंगीत लाटा सध्या चर्चेचा विषय ठरल्यात. निसर्गातल्या या अद्रुत चमत्काराला बायोलुमिनेसन्स असं संबोधलं जातं. तर मालवणच्या स्थानिक भाषेत त्याला झारो लागणं असं म्हणतात. समुद्र आणि खाडीच्या पाण्यामध्ये होणाऱ्या घुसळणीमुळे ही प्रक्रिया होते आणि लाटा रंगीत होतात. 

खाडीतून येणारे सूक्ष्म जीव आणि शेवाळ यामुळे या रंगीत लाटा निर्माण होतायत. सध्या बारा फॅदमच्या अंतरापर्यंत ही प्रक्रिया सुरू असून ती संकष्टीपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे. थंडी आणि ऊन यामुळे समुद्रातल्या सूक्ष्म जलचरांना लकाकी प्राप्त होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी समुद्राच्या रंगीत लाटा किनाऱ्यावर धडकताना दिसतायत. परदेशातही अशी स्थिती अनेकवेळा पाहायला मिळते. रात्रीच्या अंधारात समुद्राला आणि लाटांना रंगीबेरंगी लायटिंग केल्याचाच भास ही दृश्यं पाहून होतो. या हंगामात किनारपट्टी भागात पहिल्यांदाच अशा रंगीत लाटा निर्माण होतायत आणि त्या पाहण्याची दुर्मिळ संधी पर्यावरणप्रेमींना मिळालीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live