कोकणात जाणाऱ्या लक्झरीचे दर निश्चित करण्यात आले

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

कोकणात जाणाऱ्या लक्झरीचे दर निश्चित करण्यात आलेत. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या लग्झरी बससेवेचे दर अनेकदा  हजार किंवा त्यापुढे पोहोचल्याच्या तक्रारी अनेकदा येत असतात... मात्र त्या आता संपुष्टात येणारेत.

लांजा इथे बसमालक, बुकिंग एजंट यांच्यात झालेल्या बैठकीत मार्गांनुसार दरपत्रक निश्चित करण्यात आलंय.

मात्र, हे सर्व दर ऐन हंगामात वेगळे राहतील, असंही स्पष्ट करण्यात आल्याने, प्रवाशांना पुन्हा जादा दराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. एप्रिल-मे, गणेश चतुर्थी, जोडून येणाऱ्या सरकारी सुट्ट्या, जत्रा यांसाठी यापेक्षा वेगळे दर असू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आलंय.

महागाईची स्थिती पाहून प्रवाशांनी सहकार्य करण्याचीही विनंती करण्यात आलीय.

निश्चित केलेले दरपत्रक 
मुंबई-देवगड - ७०० रु. 
मुंबई-विजयदुर्ग - ७०० रु. 
मुंबई-मालवण - ६५० रु. 
मुंबई-जैतापूर - ६०० रु. 
मुंबई-आचरा - ६५० रु. 
मुंबई-शिरोडा - ६५० रु. 
मुंबई-सावंतवाडी - ६०० रु. 
मुंबई-कुडाळ - ६०० रु., 
मुंबई-कसाल - ५५० रु. 
मुंबई-कणकवली-नांदगाव-तरेळे - ५५० रु. 
मुंबई-खारेपाटण, राजापूर - ५०० रु. 
मुंबई-लांजा - ४५० रु. 
मुंबई-रत्नागिरी - ५०० रु. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live